नाशिक : ( पद्माकर पवार)
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलच्या गौरी क्षीरसागर हिने ज्युदो या क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश प्राप्त केले.
19 जानेवारी 2023 व 20 जानेवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत गौरी क्षीरसागर हिने 17 वर्षाखालील वयोगटात, 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. आता तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यांनी केले अभिनंदन
तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड.नितीन (भाऊ) ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश (आबा) पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्करराव ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोकराव पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
यांचे मार्गदर्शन लाभले
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय होळकर, सुहास खर्डे, मंगला शिंदे, जयंत आहेर, हरिभाऊ डेर्ले, राजाराम पोटे, सुयश कुंभार्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
—