नाशिक : प्रतिनिधी
‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ (योगी कथामृत) या जगप्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद यांनी स्थापित केलेल्या योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी आपल्या गुरूंच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणारे गुरुपौर्णिमा पर्व येथे उत्साहात साजरे केले.
योगदा सत्संग ध्यान मंडळी, नाशिक यांचे मुख्य ध्यान केंद्र सोहम, सहजीवन कॉलनी, कॅनडा कॅनडा कॉर्नर येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी गुरुदेव श्री श्री परमहंस योगानंद यांनी शिकवलेले क्रियायोग ध्यान, भजन, कीर्तन व प्रसाद वितरण करण्यात आले. अनेक शिष्यांनी आपल्या गुरूंच्या प्रति समर्पण भाव व्यक्त केला.
