नाशिक : प्रतिनिधी
मानवसेवा विकास फाउंडेशनद्वारा संचालित मानवसेवा पॅरामेडीकल कॉलेज, अमरावती यांच्यावतीने पाचवे राष्ट्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा निवासी समेलन – २०२५ निमित्त राज्यस्तरीय महर्षी पतंजली योगशिक्षक मानवसेवा पुरस्कार २०२५ चा सन्मान सोहळा श्री संत गुलावबाबा आश्रम येथे नुकताच झाला.
संस्थेमार्फत समाजातील कला, क्रीडा, समाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील योगशिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या राज्यस्तरीय महर्षी पतंजली योगशिक्षक मानवसेवा पुरस्काराने चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे योग प्रशिक्षक, तसेच योग विद्याधाम, चांदवडचे केंद्रप्रमुख अंबादास (राहुल) भिलाजी येवला यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
योग प्रशिक्षक व स्पर्धा परीक्षक अंबादास (राहुल) भिलाजी येवला यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजाच्या आरोग्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात योगाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. प्रमुख अतिथी माजी आ. रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, मानवसेवा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर पाटील, प्राचार्य डॉ. अक्षय चौधरी, प्रा. कृणाल महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते राहुल येवला यांना राज्यस्तरीय महर्षी पतंजली योगशिक्षक मानवसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्यात भाजपाचे शहराध्यक्ष उमेश भोंडे, ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शंकरराव गावंडे, संगई कन्याशाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव मुरकुटे, पत्रकार गजानन चांदुरकर, स्पर्धेचे मुख्य जज ॲड. आनंद जगदेव, योगा थेरपिस्ट नरेंद्र गांगुर्डे, शिवसेना उपशहर प्रमुख विनोद पाटील व समाजसेवक मुरलीधर तुरखडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे, भाजपा किसान मोर्चा राज्य सदस्य गजानन काळमेघ, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख विनोद पाटील, आयुर्वेदाचार्य डॉ. राजेश अस्वार, तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
योग प्रशिक्षक राहुल येवला यांच्या सन्मानाबद्दल एसएनजेबी संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे योग विद्या धाम, योग विद्या गुरुकुल, योगासन भारत, महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन, नाशिक जिल्हा योगासना स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, क्रीडा भारती, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन तसेच इतर योग संस्थेचे पदाधिकारी, सदस्य,योग शिक्षक, योगसाधक, मित्रपरिवार आदींनी अभिनंदन केले.
—