नाशिक : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे त्रिमूर्ती चौकातील पेठे विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे देण्यात आले.

सकाळी आठला हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी धम्मगिरी योग महाविद्यालयाचे प्राचार्य तथा दंत शल्यचिकित्सक डॉ. विशाल जाधव, डॉ. पल्लवी जाधव, उपप्राचार्य राजेंद्र काळे, योगशिक्षिका आरती आठवले आदींनी विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, तसेच योगासनांविषयी माहिती दिली. या उपक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—