जागतिक ध्यान दिवस

0

जग अखेरीस वैज्ञानिक ध्यानाचे दूरगामी आणि गहन महत्त्व ओळखू लागले आहे, विशेषतः या उन्मादग्रस्त युगात!
‘डिसेंबर 21’ हा दिवस दरवर्षी ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा करून संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्तींना आणि अगदी राष्ट्रांनाही ध्यानाला मानव विकासातील मौल्यवान घटकांपैकी एक म्हणून प्राधान्य देण्यास प्रेरित केले आहे.
ध्यानाची सुयोग्य व्याख्या म्हणजे ईश्वरावरची एकाग्रता. दररोज थोडा वेळ जरी ध्यानासाठी दिला, तरी त्या साध्या अभ्यासाने मानव आपल्या शांततेचा स्तर आणि अगदी शारीरिक आरोग्यही लक्षणीयरीत्या वाढवू शकतो.
पाश्चात्त्य जगात ‘योगाचे जनक’ म्हणून व्यापकपणे परिचित तसेच जगभर प्रशंसित ‘योगी कथामृत’ या पुस्तकाचे लेखक परमहंस योगानंद यांनी ध्यान सर्व मानवांसाठी परम महत्त्वाचे आहे, यावर विशेष भर दिला आहे.
क्रियायोगासारखा वैज्ञानिक ध्यानमार्ग — जी उच्च स्वत्वाशी (स्वतःच्या उच्च आत्मस्वरूपाशी) तादात्म्य साधण्यासाठीची समग्र व वैज्ञानिक, सर्वसमावेशक पद्धती आहे — अवलंबल्यास, प्रत्येक व्यक्तीला खरी आंतरिक शांती शोधण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती साधता येते. इतकेच नव्हे तर, क्रियायोगातील ध्यानप्रणाली आणि त्याच्या सहायक प्रणाली शरीर, मन आणि आत्म्याला अत्यंत आवश्यक असे पुनरुज्जीवन प्रदान करतात.

‘योग’ हा शब्द प्रत्यक्षात ईश्वराशी एकत्व सूचित करतो; आणि ध्यानाभ्यास हा योगमार्गाचा अविभाज्य अंग आहे. परमहंस योगानंदांनी 1917 मध्ये स्थापन केलेली योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) या थोर गुरूंच्या क्रियायोग शिकवणींचा प्रसार करते; ज्यामध्ये आत्म-साक्षात्कार या परम उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी नियमित, गहन ध्यान हे प्रमुख साधन मानून त्यावर अत्यंत भर दिलेला आहे.
‘योगी कथामृत’ या पुस्तकामध्ये परमहंस योगानंदांनी असे नमूद केले आहे की क्रियायोग ध्यानाचे विज्ञान इतर सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे; आणि भक्तीभावाने  आचरल्यास, परम ध्येय प्राप्त करण्यात ते कधीही अपयशी ठरत नाही!
दररोजच्या दिनचर्येत ध्यानाचा अंगीकार पुढे ढकलला तरी चालेल, असा व्यस्त व्यावसायिकांचा समज सर्वथा चुकीचा आहे. व्यस्त जीवनात तर त्यातून अपरिहार्यपणे येणाऱ्या ताणतणावांना अधिक समर्थपणे हाताळण्यासाठी ध्यानाचा अधिक सराव अत्यावश्यक असतो.
हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासाने हे अधोरेखित केले आहे की जे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नियमितपणे ध्यान करतात, ते त्यांच्या कामकाजातही स्पष्टपणे अधिक यशस्वी ठरतात. मानसिक आरोग्य व कल्याण-विषयक आधुनिक तज्ज्ञ देखील निरोगी, आनंदमय आणि समाधानी जीवन जगण्यासाठी ध्यान हा एक उत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगतात.
ज्यांनी आपल्या जीवनात नियमित आध्यात्मिक साधनेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, ते गहन ध्यानासाठी जितका अधिक वेळ काढू शकतील तितके उत्तम. वर्षानुवर्षांच्या ध्यानामुळे प्रत्येक मानव अधिक प्रसन्न, संतुलित, कार्यक्षम, आणि शारीरिकदृष्ट्याही निरोगी होईल, हे निश्चित आहे.
परमहंस योगानंदांनी स्मरणीय शब्दांत म्हटले आहे, “हे पुढे ढकलता येईल आणि तेही पुढे ढकलता येईल; परंतु ईश्वराचा आपला शोध मात्र पुढे ढकलता येणार नाही!” आणि त्या शोधाला गती देण्याचा मार्ग म्हणजे ध्यान करणे!
परमहंस योगानंदजींचे सर्वपरिचित थोर गुरुदेव स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी अत्यंत प्रेरणादायी आणि नेमक्या शब्दांत असे सांगितले: “जर आपण आत्ता आध्यात्मिक साधना करीत असाल, तर भविष्यातील सर्व काही अधिक उत्तम होईल!”
विश्व ध्यान दिवस आपणा सर्वांना हे स्मरण करून देणारा असावा आणि असलाच पाहिजे की, या जीवनात चिरस्थायी शांती व आनंद प्राप्त करायचा असल्यास, ध्यान हा पर्याय नसून ते अनिवार्य आहे.
तर मग, प्रिय वाचकहो, आपण आणखी कशाची प्रतीक्षा करत आहात?
अधिक माहितीसाठी:
yssofindia.org

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.