वडाळा महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालय, वडाळा, नाशिक येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील होते. त्यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
प्राचार्य डॉ. पाटील यांनी कर्मवीर हिरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. सोमनाथ विघे यांनी कर्मवीरांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “स्पर्धा परीक्षा देत असताना गणित विषयातील येणाऱ्या अडचणी” या विषयावर राज्यस्तरीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संदीप देवरे, ग्रंथापाल अशोक बागूल, कार्यालयीन प्रमुख प्रितम देवरे, परीक्षा विभाग प्रमुख सादिक पिरजादा, तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.