नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी मविप्र सेवक सोसायटीचे संचालक विनीत धर्मराज पवार यांची, तर राज्य प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय ह्याळीज निवड करण्यात आली. सारडा कन्या विद्यालयात सहविचार सभा झाली. याप्रसंगी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष डी. यु. अहिरे होते. या सभेस जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक के. के. अहिरे, किशोर जाधव, सुनील भामरे, राज्याध्यक्ष दिनेश पवार, ज्येष्ठ नेते अनिल निकम, वाय. आर. पवार, जिल्हाध्यक्ष सचिन शेवाळे, जिल्हा पदाधिकारी अरुण पवार आदी उपस्थित
होते.
एनडीएसटीचे संचालक अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. सभेत मागील विषयासंदर्भात सुनील भामरे, पोपट विश्वास, दिनेश पवार, संग्राम करंजकर, योगेश जाधव, सचिन शेवाळे, विनीत पवार यांनी आपली भूमिका विशद केली. जिल्हा शहरी कार्यवाह म्हणून अनिल रौंदळ यांची, तर ग्रामीण कार्यवाह म्हणून अरुण पवार, कल्पेश चव्हाण यांची निवड झाली. सभेस जिल्ह्यातील कार्यकारिणी पदाधिकारी योगेश जाधव, सुभाष सोनवणे, रामदास गडकरी, रमाकांत भामरे, धनंजय चव्हाण यांच्यासह महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
—