नाशिक : प्रतिनिधी
येथील गंगापूररोडवरील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयच्या प्रांगणामध्ये वीरबाल दिन कार्यक्रम उत्साहात झाला. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक सीनियर कॉलेजच्या प्रा. डॉ. वाल्मिक इंदासे उपस्थित होते. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, तसेच सरस्वती पूजन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.

आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे यांनी प्रास्ताविकात बालवीर दिनाचे महत्त्व प्रशिक्षणार्थ्यांना पटवून दिले. गटनिदेशक उमेश पालवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. इंदासे यांनी सांगितले, की जे जे बालवीर होऊन गेले, त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे. सीनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी सिद्धी अशोक लोखंडे आणि मानसी आनंदा भोर यांनी हॅण्डबॉलमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ करत राज्यस्तरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर आयटीआयमधील फिटर ट्रेडचा विद्यार्थी ऋषिकेश संजय पगार याने १९ वर्षाखालील अथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर १०० मीटरमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला, त्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. तसेच या तीनही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले. यानंतर वीरबाल दिनानिमित्ताने लघु भाषण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देण्यात आले.
सर्वांनी राष्ट्रीय मूल्ये व शौर्य शपथ घेतली. निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी निदेशिका सोनाली खिराडी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, निदेशिका प्रतीक्षा बदादे, अमोल नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
—