नाशिक : प्रतिनिधी
होमगार्डच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक शहर पथकामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर होमगार्डतर्फे पथसंचलन करण्यात आले. होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) आदित्य मिरखेलकर यांनी संचनानाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्त नाशिक शहर पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. त्यांचा सत्कार व होमगार्ड सेवेचे कौतुक प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव, केंद्रनायक हरून तडवी, पलटण नायक शांतीलाल निनावे यांनी केले. नाशिक शहर समादेशक दिनेश पवार यांनी शुभेच्छा व पर्यावरणाचा संदेश देत फुलांची रोपे भेट दिली.
याप्रसंगी नाशिक शहर पथकातील वरिष्ठ पलटणनायक श्रीकांत जाधव, रमेश कळमकर, पलटण नायक विनय शिंत्रे, सुमंत महाजन, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, जिल्हा कार्यालयातील कर्मचारी अभिषेक तांबडे सर, दीपक जाधव, मानसेवी शिक्षक चेतन गायकवाड, मनोज कनोजिया, संगीता पगारे, प्रशांत अवसरकर यांनी सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रेरणा दिली.

संचलनाच्या वेळी संतोष शेलार, विनोद वानखेडे, बाबासाहेब सोनवणे, मंगला तिवारी, माधुरी शिरसाट, मेघमाला जाधव, नसरीन शेख, तसेच नासिक रोड बँड पथकातील सर्व होमगार्ड कर्मचारी व नाशिक शहर पथकातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल समादेशक अधिकारी दिनेश पवार यांनी सर्व होमगार्ड जवान यांचे आभार मानले.
—