नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीच्या विद्यार्थ्यांनी सुपरमार्केटला शैक्षणिक सहल नेण्यात आली. विद्यार्थांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी सुपरमार्केटमधील विविध विभागांचे निरीक्षण केले.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, चीज, दही यांची माहिती घेतली. किराणा विभागात तांदूळ, पास्ता, डबाबंद वस्तूंचा अभ्यास केला. तसेच कपड्यांच्या विभागात विविध प्रसंग व ऋतूंनुसार वापरल्या जाणाऱ्या कपड्यांची माहिती मिळवली. घरगुती वस्तूंमध्ये स्वच्छता साहित्य, पेपर प्रॉडक्ट्स यांची माहिती समजून घेतली.
या सहलीत विद्यार्थ्यांनी अन्नाचे प्रकार, अन्नघटक आणि संतुलित आहाराचे महत्त्व शिकले. विविध प्रसंगांसाठी व हवामानासाठी योग्य कपडे कसे निवडावेत, हेही त्यांनी आत्मसात केले. तसेच बिलिंग व पेमेंट प्रक्रियाही प्रत्यक्ष पाहून शिकल्याने त्यांना जीवनातील प्रत्यक्ष कौशल्यांची माहिती मिळाली.
—