नाशिक : प्रतिनिधी
येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये टीमलीज फाउंडेशन व एबीबी कंपनीच्यावतीने प्रशिक्षणार्थ्यांना २० दिवसांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून (दि. २६ सप्टेंबर) सुरुवात झाली. याप्रसंगी टीमलीज फाउंडेशन व एबीबीचे प्रशिक्षण अधिकारी बेदमुथा, तसेच कुबेर सोल्युशनचे संस्थापक अनिल गावडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाविषयी माहिती दिली
परदेशातही मुलाखतीला जाताना याचा फायदा
बेदमुथा यांनी प्रशिक्षणार्थ्यांना या कोर्सविषयी माहिती देताना सांगितले की, या कोर्समुळे प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्व अधिक सुदृढ होईल. तसेच मुलाखतीला जाताना अगदी सॉक्स, कपडे, बेल्ट, केशभूषा आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा असला पाहिजे यांचे बारकावे सांगितले. प्रशिक्षणार्थी या वीस दिवसांच्या प्रशिक्षणातून परिपूर्ण होईल. तो कोणत्याही क्षेत्रात मुलाखतीला जाताना, त्याला कुठल्याही अडचणी येणार नाही. तो केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मुलाखतीला जाताना याचा फायदा होईल.
प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा ज्ञान घेताना आळस करू नये
कुबेर सोल्युशनचे संस्थापक अनिल गावंडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी बोलताना सांगितले की, प्रशिक्षणार्थ्यांनी जे जे चांगले ज्ञान आत्मसात करता येईल ते त्याने केले पाहिजे. त्यात त्याने आळस करावयास नको. याचे उदाहरण देताना त्यांनी पॅराशुटामल गोळीचे उदाहरण दिले. गोळी कडवट असते मात्र ती गोळी शरीराचे आजार बरा करते म्हणून प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा ज्ञान घेताना आळस करू नये. ते जास्तीत जास्त ज्ञान घ्यावे असे त्यांनी सांगितले.
विविध ज्ञान जोपासले पाहिजे
आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रशिक्षणार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व कसे वाढवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी विविध ज्ञान जोपासले पाहिजे व या ठिकाणच्या कोर्समधून प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
आयटीआयच्या निदेशिका प्रतीक्षा बदादे यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली खिराडी यांनी आभार मानले.
यांची उपस्थिती
मंचावर गटनदेशक साहेबराव हेंबाडे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, अमोल नागरे, गोकुळ बेदाडे, योगेश गांगोडे, अजय पवार उपस्थित होते.
—