नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये रक्षाबंधनला बस अंकल, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. या सणाच्या माध्यमातून बाल वर्गातील मुलांमध्ये प्रेम सन्मान आणि संरक्षण यासारख्या मूल्यांची जडणघडण करण्यात आली.
नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनिअर केजीमधील सर्व मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष राखी बनवण्याच्या उपक्रमात भाग घेतला. रंगीबेरंगी कागदी तुकड्यांपासून त्यांनी सुंदर राख्या तयार केल्या. शिक्षकांनी मुलांना समजावून सांगितले की, रक्षाबंधन हा केवळ भावाला राखी बांधण्याचा सण नसून आपले रक्षण आणि काळजी घेणाऱ्यांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
—