गीतेचे कालातीत ज्ञान 

(गीता जयंती विशेष)

0

भारतातील मुलांनी मोठे होत असताना ऐकलेल्या सर्व कथांपैकी, महाभारताच्या कथेने त्यांना शतकानुशतके सर्वात जास्त मोहित केले आहे. तरीही कथानकातील वैविध्यपूर्ण गुंतागुंती, उपकथानके आणि खोडसाळपणा किंवा फसवणूक या सर्वांनी महाभारतातील पृष्ठे भरली आहेत, ज्याचे सार गीतेच्या संदेशात समाविष्ट आहे. परमेश्वराने स्वत: त्याच्या भक्ताला, महान पांडव योद्धा, अर्जुनाला दिलेला कालातीत असणारा, युगानुयुगांचा आणि शाश्वत असा दैवी उपदेश विलक्षणपणे भगवद्गीता या स्वर्गीय गीताच्या स्वरुपात अंतर्भूत आहे.

  असे अगदी यथार्थपणे म्हटले जाते की, साधकाच्या आध्यात्मिक  प्रवासात कोणत्याही वेळेस तो ज्या निर्दिष्ट स्तरांवर स्थित आहे, ते स्तर गीता प्रकाशित करते.
  दरवर्षी डिसेंबरमध्ये गीता जयंती जगभरात साजरी केली जाते आणि या महान धर्मग्रंथातील सूक्ष्मभेद या काळात तज्ञांनी विशेषपणे निदर्शनास आणले आहेत.
  कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, भगवान श्रीकृष्णाने ‘स्वत:च्या नातेवाईकांशी लढण्याची इच्छा नसलेल्या, निराश झालेल्या अर्जुनाला त्याच्या प्रत्युत्तरात परिवर्तनकारी आणि प्रेरणादायी शब्दांसह अंतिम सत्य सांगितले. ‘ श्री श्री परमहंस योगानंद यांनी लिहिलेल्या “ईश्वर – अर्जुन संवाद“ या ग्रंथात गीता आणि तिच्या अंतर्भूत संदेशाचा सखोल आध्यात्मिक अर्थ आहे. योगानंदजींनी “योगीकथामृत” आणि इतर अनेक अत्यंत प्रेरणादायी आध्यात्मिक पुस्तकेही लिहिली आहेत.
   “ईश्वर-अर्जुन संवाद” या ग्रंथाच्या दोन खंडांमध्ये योगानंदजींनी गीतेमध्ये समाविष्ट असलेल्या 700 श्लोकांच्या खऱ्या महत्त्वाचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या दिव्य उपदेशाचा सार असे आहे की, आपल्यातील प्रत्येकजण एक आत्मा आहे, शरीर नाही आणि अंतर्यामीच्या पांडवांनी अखेरीस आतील कौरवांवर विजय मिळवला पाहिजे, ज्यामुळे तो आत्मा जन्म आणि मृत्यूच्या अंतहीन चक्रांपासून मुक्ती मिळवू शकेल.
  ज्याप्रमाणे भगवंतानी आपला शिष्य अर्जुनाला सर्वोपरी युद्धाचा सल्ला दिला, त्याचप्रमाणे प्रत्येक मानवाने परम मोक्ष साध्य करण्यासाठी स्वतःचा अहंकार, सवयी, क्रोध, दुष्टपणा, वासना आणि भौतिक इच्छांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे योगानंदजी खुलासा करतात की, महाभारतातील प्रत्येक पात्र, आपल्यातील दुष्ट कौरवांचे किंवा चांगल्या पांडवांचे प्रतिनिधित्व करते याच्या अनुषंगाने, एकतर आपण त्यावर मात केली पाहिजे किंवा त्याचे परिपोषण केले पाहिजे, या अद्वितीय गुणाचे उदाहरण देते.
  योगानंदजींची ‘क्रिया योगाची ‘ शिकवण गीतेच्या महत्वाच्या संदेशाभोवती परिभ्रमण करते. योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस.) द्वारा प्रकाशित योगानंदजींच्या ‘गृह अभ्यास’ पाठांमध्ये ‘क्रिया योग’ ध्यानाच्या तंत्रांबद्दल पद्धतशीरपणे  सूचना दिलेल्या आहेत, जो आत्म-साक्षात्काराचा सर्वोच्च मार्ग आहे. हे योगदाचे पाठ सर्व सत्यशोधक साधकांसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांनी आधीच लाखो साधकांना त्यांचा आध्यात्मिक शोध गतिमान करण्यासाठी सक्षम केले आहे.
  ध्यानाच्या या सर्वोच्च वैज्ञानिक तंत्राचा, ‘क्रिया योगाचा’ गीतेमध्ये  दोनदा उल्लेख केला गेला आहे. महावतार बाबाजींनी साकारलेल्या ‘लीले’द्वारे एकोणिसाव्या शतकात मानवजातीला त्याचा पुन्हा शोध लागला. महावतार बाबाजींनी त्यांचे शिष्य लाहिरी महाशय, आणि योगानंदजींचे परमगुरू यांना ते ज्ञान दिले. स्वामी श्री युक्तेश्वरगिरींना लाहिरी महाशयांनी ‘क्रियायोगा’ची दीक्षा दिली होती. पुढे त्यांनी त्यांचे प्रमुख शिष्य योगानंदजी यांना दीक्षा दिली.
  भारतात एक म्हण आहे, “जिथे कृष्ण आहे, तिथे विजय आहे!” ते खरोखरच भाग्यवान आहेत, ज्यांनी गीतेच्या शिकवणुकीचे पालन करण्यासाठी आपले जीवन संलग्न केले आहे. अधिक माहितीसाठी.: yssi.org
लेखक : विवेक  अत्रेय

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.