नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात झाला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी आकर्षक वेशभूषेत उपस्थित होते.
निरोप समारंभाचे विशेष आकर्षण ‘मास्टर लॉरेन्स’ व ‘मिस लॉरेन्स’ ही स्पर्धा ठरली. या स्पर्धेसाठी उत्सुक विद्यार्थ्यांच्या पूर्वमुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यामधून उत्कृष्ट उत्तरे देणाऱ्या दहा विद्यार्थ्यांची स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या दिवशी या सर्व दहा विद्यार्थ्यांना मंचावर बसवून प्रमुख पाहुण्यांनी एकेका विद्यार्थ्याला प्रश्न विचारले. प्रश्नांना समर्पक, आत्मविश्वासपूर्ण उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून मास्टर लॉरेन्स, मिस लॉरेन्स व उपविजेते निवडण्यात आले. मिस लॉरेन्स म्हणून सेंजुती दत्ता व मास्टर लॉरेन्स म्हणून प्रज्वल शिरसाठ, तर उत्तेजनार्थ मिस लॉरेन्स म्हणून दिशा शर्मा व उत्तेजनार्थ मास्टर लॉरेन्स मन भेन्सादिया यांची निवड करण्यात आली.
निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मिळून विविध नृत्यांची सादरीकरणे केली. हा संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमस्थळी आकर्षक सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. ज्याचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
या प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे नाव असलेले मग मग, तसेच शाळेच्या नावाची कॅप भेट म्हणून देण्यात आली.
—