म्हसरूळ येथील वंदना गणेश पेलमहाले यांच्या प्रभाग क्रमांक 1 च्या संपर्क कार्यालयाचा नुकताच शुभारंभ

0

नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील वंदना गणेश पेलमहाले यांच्या प्रभाग क्रमांक 1 च्या संपर्क कार्यालयाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  रंजन ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सरचिटणीस संजय खैरनार, पंचवटी अध्यक्ष शंकर मोकळ, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे, भाजप नेते राजू थोरात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपमहानगरप्रमुख सुनील निरगुडे, महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)चे विपुल भांगे, सामाजिक कार्यकर्ते सुनिलसिंह परदेशी, प्रवीण जाधव, एकता ज्येष्ठ्य नागरिक संघ, ओम गुरुदेव हास्यक्लबचे सदस्य व परिसरातील ज्येष्ठ्य नागरिक व महिला उपस्थित होते.

गणेश पेलमहाले यांनी आपला वाढदिवस साजरा न करता ११ हजार रुपये रोख सकाळ रिलीफ फंडाला एकता जेष्ठ नागरिक संघांमार्फत विनायक सूर्यवंशी, सतीश जोशी यांच्याकडे रंजन ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द केली. तसेच उपस्थित नागरिकांनी सहभागी होत २१०० रुपये असे मिळून एकूण 13 हजार शंभर रुपयांची मदत पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिली. तसेच वंदना पेलमहाले यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना आरोग्याच्यादृष्टीने आठ कमोड चेयर, आठ वॉकर आणि चार व्हील चेयर असे साहित्य मोफत वापारासाठी उपलब्ध करून दिले.

तसेच येत्या नाशिक महानगर पालिका निवडणुकीत वंदना गणेश पेलमहाले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सहकार्य करणार असल्याचे उपस्थिती नागरिकांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.