सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुभाष काकड, व्हाईस चेअरमनपदी ॲड. आर. एन. लोहकरे यांची निवड

पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

0
नाशिक : प्रतिनिधी
मेरी – म्हसरूळ येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नाली शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या चेअरमनपदी संस्थापक सुभाष काकड, व्हाईस चेअरमनपदी ॲड. आर. एन. लोहकरे, तर सेक्रेटरीपदी वीज कामगारांचे राज्यस्तरीय पदाधिकारी अरुण म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुकीवेळी नवनिर्वाचित संचालक सुखदेव पाटील, राहुल पवार, अविनाश दरगोडे, सुरेश चव्हाण, अजय मुळाणे, दिलीप रुडाणी, दीपाली गीते, गीतांजली घोरपडे, कार्यलक्षी संचालक अमोल सुर्यवंशी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचे आमदार राहुल ढिकले, भाजपचे गटनेते अरुण पवार, स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी, आयटक कामगार संघटनेचे राज्य नेते कॉ. राजू देसले आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी व संचालकांचे कुटुंबीय, तसेच हितचिंतक व मित्रपरिवार उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.