नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या सहयोगाने गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी सहभाग परिसंवाद यशस्वीरीत्या झाला.
या परिसंवादात एकूण १०८ विद्यार्थ्यांनी गटचर्चेत सक्रिय सहभाग नोंदवून शाश्वत विकास, विकसित भारत : माझे स्वप्न, माझी योजना आणि राष्ट्रीय धोरण आणि मी या विषयांवर आपले विचार मांडले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले मत व कल्पना व्यक्त करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले.
शाश्वत विकास या विषयावर विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये युवकांची भूमिका यावर भर दिला. विकसित भारत : माझे स्वप्न, माझी योजना या चर्चेत २०४७ पर्यंत तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत, आर्थिकदृष्ट्या सक्षम व भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यामध्ये डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. नॅशनल पॉलिसी ॲण्ड मी या विषयावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयी विचार मांडले. तसेच भावी शिक्षक म्हणून या धोरणाचा त्यांच्या भूमिकेवर होणारा परिणाम स्पष्ट केला. सर्वांगीण शिक्षण, कौशल्यविकास आणि तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विषय सादर करत प्रभावी संवादकौशल्य, संघभावना आणि विषयाचे सखोल आकलन दर्शविले.
या परिसंवादास प्रमुख परीक्षक म्हणून प्रा. (डॉ.) संजीवनी महाले, संचालिका, स्कूल ऑफ एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि प्रा. डॉ. विजया पाटील व्यवस्थापकीय संचालिका, एएए इंजिनिअरिंग, अंबड, नाशिक उपस्थित होत्या. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर सूचना, तज्ज्ञ मूल्यमापन आणि विधायक अभिप्रायामुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली व परिसंवाद अधिक समृद्ध झाला.
या कार्यक्रमाला अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे आणि प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन भाग्यश्री कुलकर्णी यांनी आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रिया कापडणे, शैक्षणिक समन्वयक व विभागप्रमुख यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या केले. सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग आणि शिस्तबद्ध वर्तन हे कार्यक्रमाच्या यशाचे मुख्य कारण ठरले.
—
अशोका एज्युकेशनमध्ये विद्यार्थी परिसंवाद उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.