नाशिक : प्रतिनिधी
योग आणि निसर्गोपचाराने सदृढ समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष व नाशिक येथील शिवगोरक्ष पीठाचे महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज यांनी केले.
सूर्या फाउंडेशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, आयुष मंत्रालय आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर (दादर) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ मैदानावर नुकताच योग महोत्सव उत्साहात झाला. याप्रसंगी कार्यक्रमात स्वामी शिवानंद महाराज बोलत होते. नाशिकमधून श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मीना शेख, योगशिक्षक महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, योगाचार्य अशोक पाटील, वैशाली पाटील, डॉ. विनोद भट, माया बुरकुल यांनी सहभाग नोंदविला आणि निसर्गोपचार व रोगमुक्त भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसार नाशिकमधून सर्वतोपरी पोहोचविण्याचा संकल्प घेतला.
हजार साधकांची प्रात्यक्षिके
या योग महोत्सवात मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाचे डायरेक्टर डॉ. ईश्वर बसवारेड्डी यांनी संपूर्ण भारतात सुरू असलेला कॉमन योगा प्रोटोकॉलची माहिती सुमारे एक हजार साधकांना देत प्रात्यक्षिक करून घेतली. याप्रसंगी डॉ. क्रांतिवीर महिंद्रकर या लेखकाचे योग व निसर्गोपचार या विषयावरील तीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डाॅ. तस्मिना शेख यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष मंत्रालय व आयएनओचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. नितीनकुमार माळी यांनी सूत्रसंचालन केले. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार यांनी आभार मानले.
चर्चासत्राचे आयोजन
द्वितीय सत्रात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ईश्वर बसवारेड्डी, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. कुमुद जोशी, सद्गुरु मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनचे अध्यक्ष योगीराज डॉ. मंगेशदा, सुबोध तिवारी, डॉ. जितेंद्र आर्या, डॉ. प्रदीप शहा, डॉ. अजित गर्गेकर, डॉ. गौतम शहा, डॉ. नारायण राव, डॉ. राज सातपुते, माजी महापौर अरुण देव यांनी वेगवेगळ्या विषयांवर मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रात महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील योगसाधक, तसेच निसर्गोपचार तज्ज्ञांची उपस्थिती होती. नवापूर येथील योगशिक्षक प्रा डॉ. नितीनकुमार माळी यांनी स्वागतगीत, तर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्राच्या सहनिमंत्रक, उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव आणि श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख यांनी योगगीत म्हटले.
1500 साधकांचा सहभाग
उपस्थितांना अल्पोपहार व भोजनाची संपूर्ण व्यवस्था नाशिक येथील शिवगोरक्ष पीठाचे महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज यांनी केली. या कार्यक्रमासाठी सुमारे पंधराशे साधकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीनकुमार माळी, तसेच सिनेअभिनेत्री सिमरन अहुजा यांनी केले. समारोपप्रसंगी डाॅ. तस्मीना शेख यांनी राष्ट्रगीत म्हटले.
—