नाशिक : प्रतिनिधी
योग ही एक जीवनपद्धती आहे. यात आसन, प्राणायामाच्या अभ्यासाबरोबरच आहार, विहार व निद्रा या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. श्रीमद् भगवद्गीता, प्राचीन योगग्रंथ व आयुर्वेद यामध्ये याविषयी दाखले देण्यात आले असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते योग विद्या गुरुकुलचे उपाध्यक्ष डॉ. गंधार मंडलिक यांनी केले.
योग विद्या गुरुकुल अंतर्गत हरी ओम योग व निसर्गोपचार केंद्राचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. मंडलिक बोलत होते. याप्रसंगी केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र निकम, कार्याध्यक्ष रमेश धस, निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख प्रतिभा धस आदी उपस्थित होते.
भगवान परशुराम क्रीडा संकुल, राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी, छत्रपती संभाजी महाराज चौक, तारवाला नगर येथे हा कार्यक्रम झाला. ओमकार प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ. तुषार पाटील यांनी योग दीप हा प्रज्वलित झाला.. हे योग गीत सादर केले. रमेश धस यांनी केंद्राच्या सात वर्षातील कार्याची माहिती दिली. राजेंद्र निकम यांनी केंद्राच्या वाटचालीची माहिती दिली. प्रतिभा धस यांनी केंद्राच्या कार्यवाहीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. वृषाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रजनी खैरनार यांनी आभार मानले. विश्व कल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी योगशिक्षक व साधक यांनी सहभाग घेतला.
—