नाशिक : प्रतिनिधी
येथील शास्त्रीय संगीत गायक प्रीतम रविकांत नाकील यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे 2024ची सिनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.
कला क्षेत्रात संशोधन करणार्या निवडक संशोधकांना दोन वर्षांकरिता या फेलोशिपच्या रूपाने काही निधी प्रदान करण्यात येतो. शास्त्रीय संगीत, निर्गुणी भजन व लोकसंगीत या विषयांवर नाकील यांचे संशोधन सुरु आहे. याआधी 2015 मध्ये नाकील यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली होती.
—