नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांचा सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कुटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलन अध्यक्ष निवृत्त आयपीएस बी. जी. शेखर, वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष संजय करंजकर, मुख्य सचिव सुरेश गायधनी, सहायक सचिव सोमनाथ मुठाळ, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सुहास टिपरे यांच्या सत्काराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साजिरी काव्यसंग्रह, राज युवा प्रकाशन पुणे २०२५, साहित्य यात्री काव्यसंग्रह, भाव सुमन प्रकाशन नाशिक २०२५, जीवन माझे काव्य संग्रह रोहिणी प्रकाशन मुंबई २०२५, दरवळ शब्दचा अवधूत प्रकाशन वर्धा, २०२५ व स्त्रीत्व – एक अद्भुत भावना पल पब प्रकाशन, अहमदाबाद २०२४, निसर्ग किमया पल पब प्रकाशन अहमदाबाद २०२५ अशा विविध काव्य संग्रहामध्ये काव्य संग्रह प्रकाशित होऊन झालेल्या व साहित्य क्षेत्रात असलेल्या योगदानाची सार्वजनिक वाचनालय नाशिक यांनी सन्मानपत्र देऊन उचित सुहास टिपरे यांचा सन्मान केला आहे.
—
साहित्यात योगदानाबद्दल ज्येष्ठ्य साहित्यिक सुहास टिपरे यांचा सन्मान
Get real time updates directly on you device, subscribe now.