एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णयाची संभाजी ब्रिगेडची मागणी

0

नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रविंद्र दातीर व महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेडतर्फे पंचवटी डेपो येथील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
यावेळी दातीर, निगळ यांच्यासह जिल्हा संघटक प्रशांत सोनवणे, प्रवीण दातीर, संदीप आहेर, शुभम दाणी, विशाल सोनवणे, साहील उनवने, प्रसाद गोसावी, इशान बागुल, सिद्धांत तिसगे, साहील गांगुर्डे, आदीत्य सांगळे, कृष्णा मुसळे, गौरव चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचा गवगवा करुन एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे. तुटपुंज्या वेतनामुळे घरखर्च भागत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली व करत आहे. अशी घटना पुरोगामी महाराष्ट्रात होत असेल तर ही खेदजनक बाब आहे.
– रविंद्र दातीर व हार्दिक निगळ 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.