पोटकृमी (जंत)
अन्न खाण्यापिण्यातील गडबडी आणि आतड्यांची साफसफाई न झाल्याने पोटात कृमी निर्माण होतात. हे कृमी बऱ्याच वेळी मलाद्वारे बाहेर पडत असतात. सदर कृमी हे तांदळाच्या दाण्याच्या आकारापासून दोन फूट लांब आकाराचे असतात. हा कृमी दोऱ्याप्रमाणे सफेद असतो.
लक्षणे
पोटात वळवळ होणे, पोटात आतून टोचणे, अति भूक लागणे, सारखी खाण्याची इच्छा होणे, पोटात कधी कधी तीव्र तर कधी कधी मंद वेदना होणे इ.
कारण
न शिजलेले कच्चे अन्न, कुजलेले अन्न, शिळे अन्न खाणे तसेच अस्वच्छता जेवणापूर्वी हात न धुणे, घरात अस्वच्छता, जेवण, भांडी, पाणी अस्वच्छ असणे इत्यादी कारणांनी तसेच अति गोड अन्न सेवन वारंवार केल्याने पोटकृमी (जंत) विशेष करून लहान मुलांमध्ये बालवयात, कुमारवयात याचे प्रमाण मोठे असते.
योगोपचार
आसन- ताडासन, कटिचक्रासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, उत्कटासन, उष्ट्रासन, पर्वतासन, वक्रासन, गोमुखासन, हलासन, धनुरासन, भुजंगासन, शलभासन, शवासन.
प्राणायाम- नाडी शोधन, कपालभाती, वमन, शंकप्रक्षालन.
बंध – उड्डीयान
निसर्गोपचार– लिंबू पाणी रस सकाळी अनाशापोटी पिणे, एनिमा घेणे, व्यायाम करणे. फक्त रोटी, कच्च्या भाज्या तसेच फळे आहारात पाहिजे.
अनाशापोटी एरंडेल तेल, तसेच लिंबू पाणी रस किंवा शंख प्रक्षालन करणे. एनिमा घेणे यामुळे कृमी बाहेर पडतात. आहारात गरम पाणी प्यावे. यामुळे पोटातील किडे नष्ट होऊन पोट साफ व स्वच्छ होते. हे सलग चौदा दिवस केल्याने पचन सुधारते.
(वरील चिकित्सा योग व निसर्गोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी.)
वर्ज– अतिगोड खाणे, शिळे अन्न, कुजके, खराब अन्न खाऊ नये, अस्वच्छता, अस्वच्छ पाणी, भांडी, परिसर, घर स्वच्छ असावे.
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८