रोटरी नाशिक मिडटाउनच्या अध्यक्षपदी जे. जे. पवार, तर सचिवपदी संपत काबरा, पंकज बोबडे

26 ला पदग्रहण सोहळा

0

नाशिक : प्रतिनिधी
रोटरी नाशिक मिडटाउनच्या अध्यक्षपदी जे. जे. पवार, सचिवपदी संपत काबरा, तसेच पंकज बोबडे यांची निवड झाली आहे. २०२५-२६ सालासाठी ही निवड आहे. त्यांचा व इतर पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा २६ जून २०२५ ला सायंकाळी हॉटेल आण्णा इडली बँक्वेट हॉल, कॉलेजरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अशोक कटारिया, प्रांतपाल राजिंदरसिंग खुराना व  २०२५-२६ सालचे प्रांतपाल नाना शेवाळे उपस्थित असतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.