नाशिक : प्रतिनिधी
येथील रिदमीक इंटरनॅशनल स्कूल (Rhythmic international school) यांचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे नगरसेवक अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी, शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, गांगुर्डे, शिंदे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. नृत्य आविष्कारला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेचे संचालक विनय जैन यांनी स्वागत केले. याप्रसंगी पालकांची मोठी उपस्थिती होती.
—