वाढत्या ताणतणावांमुळे निसर्गाकडे परता : प्रा. राज सिन्नरकर

इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन

0
नाशिक : प्रतिनिधी
आपण निसर्गापासून उत्पन्न झालो आहोत. त्यामुळे आपण चांगलेच वागणारे आहोत. पण,आत्यंतीक धावपळीच्या जीवनशैलीमुळे, नकारात्मक विचारांमुळे ताणतणाव वाढले. मग सामाजिक संघर्षही वाढला. या पार्श्वभूमीवर निसर्गाकडे, प्रकृतिकडे परत जाणेच आवश्यक आहे. त्यादिशेनेच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन काम करीत आहे. हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व ज्येष्ठ योगतज्ञ प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातंर्गत प्रकृति की ओर वापसी या विषयावर प्रा. सिन्नरकर बोलत होते.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, आपले वैयक्तिक जीवन, कुटूंब, काम करण्याचे ठिकाण, सामाजिक क्षेत्र ताणतणावांनी भरलेले आहे. अणुबॉम्बपेक्षा भयंकर असा हा तणावांचा बाॅम्ब मानवतेवर कोसळलेला आहे. अशा स्थितीत आपण निसर्गाकडे म्हणजे प्राचीन जीवनशैलीकडे परतल्यास मानसिक स्थितिपाठोपाठ शारिरीक सुदृढताही येईल. म्हणजेच सर्वागीण आरोग्य लाभेल.

मी निसर्गाचा उपासक आहे, तर निसर्गाची उपासना केल्यानेच मला आरोग्य लाभेल, ही विश्वासप्रणाली आपल्यात रूजण्याची आवश्यकता आहे. हे शरीर पंचमहाभूतांनीच बनलेले आहे, तर पृथ्वी, आकाश, वायू, जल व अग्नी यांच्या उपयोगानेच आपले शरीर विकारमुक्त होईल, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नातेसंबंध कसे असावेत, यासाठीच महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिले. त्यात महायोगी प्रभू रामांच्या चरित्राद्वारे आदर्श प्राकृतिक व यौगिक जीवनाचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्याचा आधार घेऊनच सात्विक लोकांनी आपल्या घराचे दरवाजे उघडून, चांगल्या कामासाठी, प्राकृतिक चिकित्सेचा प्रसार करण्यासाठी, रोगमुक्त भारत अभियानासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामुळे वातावरण निर्मिती होऊन निसर्गाकडे परतण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल. मानवतेच्या सर्वांगिण विकासाची प्रक्रिया गतिमान होईल आणि हेच प्राचिन भारतीय ऋषिंचे स्वप्न होते…ते आपण पूर्ण करणार आहोत असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
याप्रसंगी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. अनंत बिरादर, डाॅ. सुशांत पिसे, राज्याचे कार्यकारी अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी शिवानंद, उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या डाॅ. तस्मीना शेख, जिल्हा संयुक्त सचिव सुनिता पाटील, रणजित पाटील, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते, योगशिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी रत्नपारखी, राष्ट्रीय सचिव राहुल येवला, डाॅ. योगेश सदगीर, शिक्षणतज्ज्ञ पी. डी. कुलकर्णी, इसाक शेख, जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, योगाचार्य अशोक पाटील, उल्हास कुलकर्णी, दीपाली लामधाडे, वैशाली पाटील, डाॅ. भगवान म्हस्के, डाॅ. मयुर खरे, डाॅ. रमाकांत जाधव, राधिका खंडाळकर, ॲड. पुष्पेंद्र दीक्षित आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.