नाशिक : प्रतिनिधी
संशोधन हे समाजाभिमुख असावे. तसेच संशोधन हे कागदोपत्री न राहता त्यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्युटर स्टडीज, अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका बिझनेस स्कूल या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले संशोधन प्रकल्प स्टुडंट्स रिसर्च प्रोजेक्ट स्कीम (एसआरपीएस) अंतर्गत पारीतोषिक वितरण सोहळा नुकताच झाला. याप्रसंगी डॉ. चासकर बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे उपस्थित होते. अशोका संस्थेमधून भविष्यात अनेक चांगले संशोधक उदयास येतील, असा विश्वास डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, सचिव श्रीकांत शुक्ला, संस्थेचे माजी संचालक डॉ. डी. एम. गुजराथी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर काही रोपांना पाणी टाकून, ती रोपे जलालपूर आणि महादेवपूर येथे लावण्याचा संकल्प करण्यात आला.
अशोका संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनादेखील त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीसीएसचे प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, एआयसीईएसआरच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा, एसीईच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, एबीएसचे प्रभारी संचालक डॉ. महेश वाघ यांनी केले होते. कार्यक्रमाचे समन्व्यक म्हणून डॉ. हर्षा पाटील, डॉ. प्रीती सोनार यांनी काम पहिले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रिया सिंग, प्रियंका मोरवाल, सविता शिंदे, डॉ. लीना गोऱ्हे यांचे सहकार्य लाभले.
—