नाशिक : प्रतिनिधी
अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचालित अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रीसर्च, अशोका सेंटर फॉर बिझिनेस ॲण्ड कॉम्प्युटर स्टडीज, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका बिझनेस स्कूल या महाविद्यालयांतर्फे संयुक्त पणे इंद्रधनुष्य २०२४-२५ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा जल्लोषात पार पडला. रिश्ते – एक एहसास या संकल्पनेवर आधारित हा सोहळा झाला.
या संकल्पनेचा मुख्य उद्देश मानवी नातेसंबंधांचे सौंदर्य, संवेदना आणि महत्व अधोरेखित करणे हा होता. नाती केवळ रक्ताच्या नात्यात बांधलेल्या संबंधांपुरती मर्यादित नसून, ती भावनिक बंध, सामाजिक संवाद आणि संस्कृतीच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
यांची उपस्थिती
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील विविध नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा यावर नृत्यविष्कार सादर केले. विविध नात्यांवरील अनेक बहारदार गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करीत विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आशिर्वाद सेवाग्राम ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आशिर्वाद पवार व श्रीमती गार्डा बालसदनच्या व्यवस्थापकीय संचालिका तेजस्विनी पवार उपस्थित होत्या. अशोका संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, व्यवस्थापकिय विश्वस्त आस्था कटारिया आणि प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अशोक कटारिया यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रभारी प्राचार्या डॉ. सरीता वर्मा, प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके आणि प्रभारी संचालक डॉ. महेश वाघ यांनी स्वागत केले. अशोका एज्युकेशन फाउंडेशनमधील सर्व महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दलचे सादरीकरण सिद्धी वाघ आणि बिजली धनवटे यांनी केले.
आशिर्वाद पवार यांनी सांगितले की, नातेसंबंध जपणे व त्याची कदर करणे आणि नाते निभवले, तरच त्याचे महत्त्व आहे.
डॉ. अशोक कटारिया यांनी सांगितले की, प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचे त्यांच्या आजी – आजोबांशी असणारे बंध अधिक सुदृढ करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
यांनी केले समन्वयन
काव्याक्षी सोनार व इरम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्रभारी प्राचार्य यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे समन्वयन सांस्कृतिक समितीचे प्रमुख खुशबू पवार,अनिकेत सोनगीरे, प्रियांका मोरवाल, लीना गोऱ्हे, सविता शिंदे, तसेच एआयसीईएसआरमधील पूर्वा गायधनी, हार्दिका बागुल, एसीबीसीएसमधील पूर्वी जोशी, मौलीक गोडा, एसीईमधील रिशिका राखेजा व एबीएसमधील ऋषभ बोथरा, सिद्धार्थ लोढा या सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.