सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : न्यूमोनिया  

0

न्यूमोनिया

शरीरातील विजातीय द्रव्य रक्तात मिसळून ते फुफ्पुसात येऊन एकत्र साठतात. तेव्हा न्यूमोनिया म्हणजे (Pneumonia) फुफ्फुस संसर्ग, कफोक्त संचय किंवा श्वासाला अडथळा निर्माण करणारा, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हा विकार अधिक होतो. विशेष ऋतू बदलत याचा वेग जास्त जाणवतो. रोग प्रतिकार शक्तीला जास्तीत जास्त हानी पोहोचवितो. या विकारात व्यक्ती अधिक संवेदनशील होतो. उष्णतेच्या दिवसात व्यक्तीची त्वचा अधिक प्रसरण पावल्यामुळे घामाद्वारे विजातीय द्रव्य शरीराबाहेर त्याग केले जातात. म्हणून हा विकार उन्हाळ्यात कमी व हिवाळ्यात जास्त होतो. हा विकार जडणे म्हणजे फुफ्फुस हे आतील विजातीय द्रव्य बाहेर फेकण्यास असमर्थ होते व श्वसन गती वाढते. परंतु फुफ्फुसाची हालचाल मंदावते. ती नैसर्गिक होत नाही म्हणून शरीराला व मेंदूला ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवठा होतो. हा विकार फुफ्फुसाच्या खालील बाजूने सुरु होतो. यामध्ये Single Pneumonia, Double Pneumonia असेही प्रकार पडतात. उपचाराचा अभाव असल्यास हा विकार तीव्र स्वरूप प्राप्त करतो. न्यूमोनिया हा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, अशक्त व्यक्ती व धुम्रपान करणाऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.

1)       बक्टेरिअल न्यूमोनिया
2)       व्हायरल न्यूमोनिया
3)       मायकोप्लाज्मा न्यूमोनिया
4)       एस्पिरेशन न्यूमोनिया
5)       फंगल न्यूमोनिया

असे प्रमुख  प्रकार पाच प्रकार पडतात.

लक्षणे

न्यूमोनियाची लक्षणे ही साधारणतः ते गंभीर असू शकतात. जिवाणूमुळे झालेल्या न्युमोनियाची लक्षणे ही व्हायरसमुळे होणाऱ्या न्युमोनियापेक्षा लवकर दिसून येतात. खोकला येणे, बेडकी पडणे, सर्दी होणे, ताप येणे, थंडी वाजून येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण जलदपणे श्वास घेत असतो, छातीत दुखणे, अंगदुखी, स्नायूदुखी, अशक्तपणा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळणे व उलट्या होणे, डोकेदुखी होणे, काही व्यक्तींच्या खोकल्यातून रक्त येणे.

कारण

न्यूमोनिया हा आजार ट्रिप टू कॉकस न्यूमोनिया या जिवाणूमुळे तसेच काही विषाणू आणि बुरशी यामुळे होतो. जेव्हा हे रोगकारके सूक्ष्मजीव श्वसनावाटे फुफ्फुसात जाऊन ओली नावाच्या बारीक नलिकेमध्ये जातात, तिथे हे सूक्ष्मजीव आपली संख्या वाढवितात आणि त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन फुफुसांमध्ये द्रव पदार्थ साठू लागतो. या द्रवामुळे फुफुसाची कार्यक्षमता कमी होते. न्युमोनियास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया व्हायरस हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न्यूमोनिया पसरू शकतो. न्यूमोनिया रुग्णाचा खोकला, शिंकेद्वारे किंवा व्हायरस दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. व्यायाम व रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव यामुळे न्युमोनिया होतो.

उपचार-

1) या विकारात व्यक्तिगत स्वच्छता महत्त्वाची आहे.
2)  व्यायाम व दैनंदिन जीवनमान महत्त्वाचे मानले आहे.
3)  यामध्ये विश्रांती ही अति महत्त्वाची आहे.

योगोपचार – रोग्याला पेलवतील असे हलके व्यायाम असणे. गुरुउपदेशानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्यावेत.

उदाहरणार्थ भुजंगासन, सर्पासन, ताडासन, कटी चक्रासन, उष्ट्रासन, शुद्धिक्रिया, तन व मन शुद्ध करण्यासाठी जलनेती व  सूत्रनेती महत्त्वाची आहे. सिंहमुद्रा, प्रणव ओंकार जप महत्त्वाचा आहे. ध्यान धारणा करावी.

सूर्यनमस्कार  सूर्यनमस्कार स्नायू शिथिल करण्यासाठी दररोज करणे आवश्यक आहे.

आसन-

उभ्या स्थितीत – ताडासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन, कोणासन, उत्कटासन, वक्रासन.

बैठ्या स्थितीत – अर्ध मत्सेंद्रासन, उष्ट्रासन, पद्मासन, वज्रासन, उत्तान मंडूकासन, मार्जरासन, गोमुखासन.

पाठीवरील आसन पवनमुक्तासन, शवासन, अर्ध हलासन, विपरीत करणी.

पोटावरील आसन भुजंगासन,सर्पासन.

क्रिया- कपालभाती, वमन, नेती

प्राणायाम नाडीशोधन, सूर्यभेदन, भस्रिका, भ्रामरी, उज्जायी.

ध्यानधारणा– प्रणव ओंकार उच्चारण करावे व नंतर शवासन करून योग निद्रा घ्यावी.

निसर्गोपचार  गरम पाणी, लिंबूपाणी वारंवार द्यावे. घाम जास्तीत जास्त येऊ द्यावा. बाष्पस्नान, एनीमा, उपवास चिकित्सा, ओली चादर लपेट, स्पंज बाथ, ज्वर असेल तर मिठाच्या पट्ट्या माथ्यावर ठेवाव्यात. थंड पाण्याने शरीर पुसून काढावे.

आहार – संत्रा, टोमॅटो, खरबूज यांचा रस द्यावा. दुपारी रसदार फळे द्यावी. थोडेसे दूध व साधी हलके भोजन द्यावे. सूर्य तप्त जल पिण्यास दिल्याने फायदा होतो.

वर्ज- धूम्रपान, अल्कोहोल घेऊ नये. प्रदूषणयुक्त वातावरणात जाऊ नये. खोकला, ठसका, शिंक, डोळ्याला पाणी येईल अशा ही वातावरणात जाऊ नये. प्रवास वर्ज करावा.

– प्राडॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर: ९८२२४५०७६

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.