सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार :  पाठीचा मणका विकार

0

पाठीचा मणका विकार

पाठीचा कणा हा खरोखर संपूर्ण मानवी शरीराचा कणा आहे. पाठीच्या मणक्याला Vertiebral Columns असे म्हणतात. यात एकूण ३३ मणके असतात. यात मानेचे मणके – १५, छातीचे मणके – १२, पाठीचे मणके – ०५, कवटीतील मणके – ०५, शेपटीतील मणके – ०४. पाठीच्या मणक्यांमुळे शरीराला सबळ आधार मिळून माणसाला उभे राहता येते. मणक्याच्या आधारानेच शरीरातील तीन महत्वाच्या गुहा, वक्ष, उदर, श्रोणी तयार होतात. मणक्याच्या एकावरील एक अशा रचनेमुळे अखंड मणका पोकळी Vertiebral Canal तयार होतो. त्यातूनच पृष्ठ रज्जू मस्तीष्कापासून खाली उतरतो. अंतर मणक्याच्या छिद्रातून बाहेर पडून इष्टस्थळी जातात. या रचनेत पार्श्वभूमी बनलेल्या अंतर मणक्यातील छिद्रातून दोन्ही बाजूस दोन मज्जा रज्जू (Spinal Nerve) बाहेर पडतात. अंतर मणक्यातील सांध्यामुळे शरीर कोणत्याही दिशेस वळविता येते. पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराला एकत्र बांधून ठेवतो. तो आधार, आकार व नाजूक अशा चेतासंस्थेचे संरक्षण करतो. याला जर काही दुखापत झाली तर शरीराचे संपूर्ण आरोग्य ढासळते. शरीराचा भर भक्कम आधार म्हणजे पाठीचा कणा मात्र हाच आधार आजच्या जीवनात कमकुवत आहे.

लक्षणे 

पाठीच्या मणक्यात चमक निघणे, तीव्र वेदना होणे, दोन मणक्यांच्या मधील चकती सरकणे, मणक्याला तडा जाणे, चेतासंस्थेला हानी पोहोचणे, हातापायाला मुंग्या येणे, तीव्र स्वरूपाचा मार लागला असेल तर हातापायांची शक्ती जाणे, अर्धांग वायूसारखा झटका येणे, बेल्सपल्सीसारखा विकार उद्भवणे, कुबड निघणे, कंबरेत शरीर पुढे झुकणे, पाठीच्या मणक्याचा नैसर्गिक इंग्रजी एस (S) आकारात मोठा बदल होणे. शरीर स्नायू कडक होतात. ताठरता येते.

कारण –

दैनंदिन जीवनमान, चुकीचे उभे राहणे, चुकीचे बसने-चालणे, मोठ्या प्रमाणत मोटार सायकल, कार, ट्रक, बस, रिक्षा, रिक्षा किंवा इतर वाहने चालविणे, नेहमी बोजाची कामे करणे, चुकीच्या पद्धतीने पुढे झुकणे, चुकीच्या पद्धतीने टीव्ही, मोबाईल स्क्रीनवर राहणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे, उशी, तक्का याचा वापर मोठ्या प्रमाणात करणे.यातून पाठीच्या कण्याचे विकार जन्माला येतात.

1) मानेचा विकार 2) स्पॉन्डीलायसीस 3) स्लीप डिस्क  4) सायटिका 5) मणका तडा जाणे 6) मणक्याचा चुरा होणे 7) मणक्याची झीज होणे 8) दोन मणक्यात घर्षण होणे 9) पाठ दुखणे 10) कंबर दुखणे 11) संधिवात 12) मणक्यात गाठ 13) मुतखडा 14) ओटीपोट दुखणे
इत्यादी आजार उद्भवतात.

उपचार –
1) पाठीच्या मणक्यामुळे संपूर्ण पाठ ही दुखत असते. यामध्ये ऑपरेशन हा सर्वात शेवटचा पर्याय असतो.
2) ॲलोपॅथित वेदनाशामक गोळ्या औषधे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

योगोपचार – हा सर्वात उत्तम उपाय आहे.

सूर्यनमस्कार  सूर्यनमस्कार स्नायू शिथिल करण्यासाठी दररोज करणे आवश्यक आहे.

आसन-

उभ्या स्थितीत– ताडासन, कटीचक्रासन, त्रिकोणासन, कोणासन, उत्कटासन, वक्रासन

बैठ्या स्थितीत– अर्ध मत्सेंद्रासन, उष्ट्रासन, पद्मासन, वज्रासन, उत्तान मंडूकासन, मार्जरासन, गोमुखासन

पाठीवरील आसन पवनमुक्तासन, शवासन, अर्ध हलासन, विपरीत करणी

पोटावरील आसन  भुजंगासन, सर्पासन,
क्रिया – कपालभाती, वमन, नेती

प्राणायाम  नाडीशोधन, सूर्यभेदन, भस्रिका, भ्रामरी, उज्जायी
ध्यानधारणा– प्रणव ओंकार उच्चारण करावे. नंतर शवासन करून योग निद्रा घ्यावी.

निसर्गोपचार 
पाठीला तेल मालिश (मसाज) हा सर्वोत्तम उपचार आहे.
1) तिळाचे तेल अथवा लसूण, कापूर तेल, मोहरीचे तेल, गरम करून थंड झाल्यानंतर मसाज करावी.
2) ट्रक्शन हा चांगला उपचार आहे.
3) दोरीचा भौतिक उपचार, व्यायाम इंटर फ़ेअरन्स ट्रीट्मेंट (IFT),
4) अल्ट्रासाउंड, वॅक्स बाथ उपयुक्त आहे.
5) इन्फ्रारेड लंप शेक, गार गरम पाणी शेक, निर्गुडी, घास, एरंडेल पाण्याचा शेक व लेप आवश्यक.
6) माती चिकित्सा, स्पायनल बाथ, स्टीम बाथ, टब बाथ

आहार – या विकारात पोट साफ असणे आवश्यक आहे.

1) आहार साधा घ्यावा. मोड आलेले तृणधान्य, पालेभाज्या रसाहार घ्यावा.
2) कडधान्य, हिरव्या, शाक भाज्या, साधी भाजी पोळी, फलाहार, पपीता, पेरू, आवळा, खरबूज, टरबूज, आहारात असावे.
3) रात्री झोपताना गरम दुध एक चमचा तुप टाकून प्यावे.
4) भाज्यांचे सुप घ्यावे.
5) पोट साफ राहण्यासाठी एनिमा, शंख प्रक्षालन, एरंडेल तेल प्यावे.

पाठीचा विकार हा पाठ न सोडणारा विकार असल्याने रुग्णास संयम महत्वाचा आहे.

वर्ज –

1)  एसी (AC) किंवा फॅन खाली झोपू नये.
2) प्रवास टाळावा. मोटारसायकल चालविणे टाळावे.
3) वेदनेकडे लक्ष देऊ नये.
4)  उंच टाचांचे चप्पल, बूट वापरणे टाळावे.
5)  वजन नियंत्रित ठेवावे.
6)  मांस, मटण, मासे खाऊ नये.
7)  धुम्रपान, अल्कोहोल वर्ज करावे.

– प्राडॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
मेल rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.