ब्रांकायटिस – आजार आणि लक्षणे
जुनाट सर्दीलाच ब्रांकायटिस म्हणतात. कंठ नलिका व तिच्या शाखांमध्ये आग होणे, श्वासनलिकेत आग होणे, स्वरयंत्रात विजातीय द्रव्यांची उपलब्धी होणे, वेदनायुक्त खोकला येणे, घशात प्रचंड खवखव होणे. घट्ट, चिकट व दुर्गंधीयुक्त कफ पडणे, गळा, कसा घरघर होणे, ब्रांकायटिसमध्ये कधीकधी भयंकर ताप येणे.
ब्राँकायटिस दोन प्रकारचा आहेत
1) नवा 2) जुना
जुन्या प्रकारात खोकला कफ हे लक्षणे विद्यमान असतात. परंतु ही ज्वराची वेदना फारशी नसते. यात प्रातःकाली खोकला खूप येणे व कफ पडणे ही विशेषता असते. नवीन प्रकारच्या ब्रांकायटिसमध्ये सांधे दुखतात. खोकला कफ ज्वर सारखे असतात.
कारण
दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव, अनियंत्रित खान-पान, त्याचे विधिवत पचन न होणे. त्यामुळे शरीरात विजातीय द्रव्य निर्माण होऊन फुप्फुसे अन्ननलिका, श्वासनलिका यांना आच्छादित करतात.
दुष्परिणाम
अशक्तपणा येणे, डोळे पांढरे होणे, डोळे खोल जाणे, अंधारी येणे, गरगरणे, वारंवार चक्कर येणे, खोकून- खोकून वारंवार खकारे काढून घसा लाल होणे, सुजणे, छातीत दुखणे, कार्यक्षमता कमी होणे, दम लागणे, धाप लागणे, जेवण न जाणे, तिखट लागणे इत्यादी दुष्परिणाम निर्माण होतात
उपचार-योगशास्त्र
1) शुद्धिक्रिया – जलनेती, सूत्रनेती, वमन, कुंजर, कपालभाती.
2) प्राणायाम – नाडीशोधन, भस्रिका, भ्रामरी
3) आसन – ताडासन, कटिचक्रासन, सुप्तवज्रासन, भुजंगासन,धनुरासन, वज्रासन, मण्डुकासन, गोमुखासन, अर्धमच्छेंद्रासन, मत्स्यासन
4) प्रणव ओंकार साधना, ध्यान
5) सिंह मुद्रा
6) सूर्यनमस्कार इत्यादी
निसर्गोपचार
प्रातःकाळी लिंबू-पाणी एनिमा घेऊन पोट साफ करणे, गरम पाद स्नान, गरम बाष्पस्नान, वाफ घेणे, गरम पाणी पट्टी छाती व घशाला गुंडाळणे, कोमट पाणी पिणे.
आहार
क्षार धर्मी आहार असावा. फळांचा रस आहारात असावा. डाळिंब रस व कातडीचा चूर्ण, अडुळसा काढा, ज्येष्ठ मध सेवन करणे, डाळ-भात, साधी रोटी, सलाड, शाकभाजी आहारात असावी.
वर्ज
बटाटा, केळी, सिताफळ, दही, दूध वर्ज करावे.
वरील प्रकारे योग व निसर्गोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास आजार समूळ नष्ट होतो.
(क्रमश : )
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ईमेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८
—