नाशिक : प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळ संचलित येथील आठवले – जोशी बालविकास मंदिरमध्ये शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मर्दानी युद्धकला गुरुकुलचे (नाशिक) अध्यक्ष तथा प्रशिक्षक परिश्रुत क्षीरसागर उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह सुधीर पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका दर्शना मोरे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पाळणा, पोवाडा आणि संवाद सादरीकरण करण्यात आले. परिश्रुत क्षीरसागर यांनी मुलांना झुल्फीकार, तेगा, नागीन, कटटी, धोप, गुर्ज, दांडपट्टा, बाणा, बनाटी, जबरदंड, उर्मी, भाला, चक्र, तलवार या शिवकालीन विविध शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्व प्रात्यक्षिकासह विशद केले. सीमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.
—
आठवले – जोशी बालविकासमध्ये शिवकालीन शस्त्रांचे सादरीकरण
Get real time updates directly on you device, subscribe now.