नाशिकमध्ये विद्या सेवा संस्थेचे संस्थापक तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे  यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रम राबवत साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी

केवळ पुस्तकी ज्ञानाचे धडे न देता, विद्यार्थ्यांच्या अंगाच्या कलागुणांना वाढ मिळावा यासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवणारे, विद्या सेवा संस्थेचे संस्थापक तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे  यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.
प्रणित विद्यालय, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमास डॉ. भारती चव्हाण (संचालक महाराष्ट्र गुणवंत कामगार कल्याण मंडळ राष्ट्रीय कृषी व्यवस्थापन), स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख श्री श्री कोठारी महाव्रत स्वामीजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार, सप्तशृंगी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका दीपाली गीते, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, कल्पना वधू-वर सूचक मंडळाचे संचालक अनिल सुकेणकर, रमेश बिरारी, पिस्तूल नेमबाज व शिवछत्रपती पुरस्कारार्थी श्रद्धा नलमवार, निलय शहा, दिलीप पिंगळे, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात, पप्पू शेख डायरेक्टर ग्रॅव्हिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मच्छिंद्र सोनवणे पिस्तोल नेमबाज, राष्ट्रीय खेळाडू, पुनम वानखेडे चेअरमन जीएसके एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड नाशिक, श्रीराम बिरारी, संजय जाधव, विद्या सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पिंगळे व उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रीडा महोत्सव, व्हर्च्युअल रियालिटी लॅबचे उद्घाटन, तसेच आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शूटिंग रेंजचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 1000 बिजांचे  रोपण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.
सदर कार्यक्रमास विद्यासेवा संस्था, नाशिक आणि मानिनी फाउंडेशन गुणवंत कामगार कल्याण मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता. ग्रॅव्हिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मोलाचे सौजन्य लाभले, अभिष्टचिंतन सोहळ्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.