नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता.
स्वराज्य परिवाराचे प्रमुख शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे, महिला प्रमुख रेखा नेहरे, सचिव विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष वाल्मीक शिंदे, महिला उपाध्यक्ष विद्या शिंदे, महिला अध्यक्ष मोहिनी भगरे, क्रीडा प्रशिक्षक भावेश जाधव, प्रदेशाध्यक्ष आकाश बकुरे, राज्य उपाध्यक्ष भरत भोये, केशव उगले, शेखर फरताळे, ॲड. शिवाजी शेळके, किरण सूर्यवंशी, दीपक तायडे, राजेंद्र पारधी, भाऊसाहेब भोंडवे, माधव पागे, शांताराम नेहरे, सोमनाथ बर्डे, डॉ. जवाहर बेदमुथा, विनोद बिरारी, वर्षा मोरोणे, सुनीता बस्ते, लतिका गरुड, प्रतिक्षा वाघ, वैष्णवी राजपूत या पदाधिकाऱ्यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. गौरव बेंडकुळे, अंजना ठमके, दिवेश मुथा, आर्यन नेहरे, ताई धनगर, देवयानी पवार, अजय शिंदे, सोनम गावित, रिंकू चौधरी, मधुराज उईके, विशाल शडमाके, आकाश जाधव, किरण भांगरे आदी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
—