नाशिक : प्रतिनिधी
भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेतर्फे रानवड येथे झालेल्या जिल्हा मेळाव्यात नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाने सर्व स्पर्धा प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकाविले. मालेगाव व नाशिक महानगरपालिका परिक्षेत्रातील शहरी गटाचे सर्वसाधारण विजेतेपद प्रमुख पाहुणे खासदार भास्कर भगरे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, स्काऊट जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, गाईड जिल्हा संघटक कविता वाघ, मुख्य प्रशिक्षक आयुक्त नवनाथ वाघचौरे, शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आले.
या मेळाव्यात सर्वच स्पर्धा प्रकारांमध्ये बक्षिसे मिळाली. त्यात तंबू सजावट, शोभायात्रा, शारीरिक कसरत यात प्रथम, तर फूड प्लाझामध्ये द्वितीय क्रमांक, सांस्कृतिक कार्यक्रम व पायोनिअरिंग प्रोजेक्टमध्ये तृतीय क्रमांक अशा भरविलेल्या सर्वच स्पर्धा प्रकारांमध्ये शहरी गटात अव्वल स्थान मिळवले.
युनिटमधील विद्यार्थी प्रभंजन रत्नाकर, युवराज वाघमारे, शिवम वानखेडे, हिमांशू शेवाळे, दीपेश केदार, रोशन पलंगे, दिशांत डमाळे, ओम थोरात, ओमकार देवरे, ओम सोनवणे आदींनी सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
महेंद्र गावित, भाऊसाहेब भोंडवे यांचे व शाळेतील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, उपाध्यक्ष जयदीप वैशंपायन, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक भास्कर कर्डिले, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक विजय मापारी, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे आदींनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.
—