अशोका एज्युकेशनमध्ये देशभक्तीपर गायन व नृत्ये सादर

0

नाशिक : प्रतिनिधी

येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या चांदसी येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज महाविद्यालय आणि अशोका बिझनेस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी निवृत्त लेफ्टनंट कर्नल उत्पल बॅनर्जी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. देशभक्तीपर गायन व विविध नृत्ये सादर करून देशभक्तीमय वातावरण निर्मिती केली आणि उपस्थितांना भारावून टाकले होते.
बॅनर्जी म्हणाले की, भारत हा आता महासत्ता बनत चालला आहे. याला हातभार म्हणून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांची तयारी करावी, जेणेकरून देशसेवा होईल. संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे म्हणाले की, भारताचे सुजाण नागरिक म्हणून सर्वानी आपले कर्तव्य पार पाडून योगदान द्यावे.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सुदर्शन नागरे, प्रा. प्रियांका मोरवाल यांनी केले. फातेमा रामपूरवाला आणि समृद्धी चिमोटे यांनी सूत्रसंचालन केले. रफत शेख हिने आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, एबीएस महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. महेश वाघ, एसीबीसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, एसीई महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.