नाशिक : प्रतिनिधी
न्यू ग्रेस अकॅडमीच्यावतीने ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉन स्पर्धा येथील चामरलेणी परिसरातील निसर्गरम्य ट्रेल रूटवर उत्साहात झाली. यात १२०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा विविध अंतरांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी एक लाख २८ हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले होते. सहभागी धावपटूंनी प्रचंड उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने धाव घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कडाक्याची थंडी असूनही स्पर्धक वेळेवर हजर होते. सकाळी सव्वासहा वाजता दहा किलोमीटरचा फ्लॅग ऑफ झाला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत – तुंगार, शिवछत्रपती अवॉर्ड व एशियन गेम्स विजेत्या संजीवनी जाधव, वर्ल्ड चॅम्पियन अॅथलेट मोनिका आथरे, न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलचे सहसचिव राजेंद्र वानखेडे, गौरी सामाजिक संस्थेच्या संस्थापक रोहिणी नायडू, न्यू ग्रेस अकॅडमीच्या अध्यक्ष राजश्री सुरावकर, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक संजय बारकुंड, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, बांधकाम व्यावसायिक सागर बोंडे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, सोनाली दाबक, अविनाश पठारे, अनिरुद्ध अथणी, अरुण पवार, सुनील लोहारकर, गणेश अहिरे, अशोक जामदार, प्रवीण कुमार खाबिया हे मान्यवर उपस्थित होते.
पाच किलोमीटर स्पर्धेत १२ ते १७ वयोगटात सोपान शिद व तेजस्वी मोरे हे विजेते ठरले. १८ ते ३० वयोगटात केशव खूरकुटे व आरबिया पठाण हे विजेते ठरले. ३१ ते ५० वयोगटात मुकेश भोये व पीएसआय गीतांजली दुदे हे विजेते ठरले. ५० वर्षांवरील वयोगटात संजय रामचंद्र पवार व जया पाटील हे विजेते ठरते.
महिला व पुरुष यांना विविध वयोगटात प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात आली. रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. दिलेले अंतर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक फिनिशन मेडल प्रदान करण्यात आले.
या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जयंत नेरकर, विजय गडाख, रवींद्र दुसाने, अमित घुगे, अविनाश लोखंडे, नेहा निकम, मंगेश राऊत, सुरेश डोंगरे, दविंदर भेला, प्रवीण कोकाटे, माधुरी गडाख, डॉ. मनिषा रौंदळ व चंद्रकांत नाईक यांनी विशेष मेहनत घेतली.या उपक्रमाचा सामाजिक संदेश अधोरेखित करत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. १० झाडे लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी शाळेने स्वीकारली आहे.
तसेच आधार संस्थेच्या मुलांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत सामाजिक समावेशकतेचा संदेश दिला.
करंडे यांनी सूत्रसंचालन केले. कांचन फिटनेस क्लबच्यावतीने वॉर्म-अप सेशन घेण्यात आले. ज्यामुळे सहभागी धावपटूंना योग्य मार्गदर्शन मिळाले. ‘ग्रेस ऑक्सिजन मॅरेथॉनमुळे फिटनेस, पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला गेला असून, अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
—