नाशिक : प्रतिनिधी
पाचव्या निसर्गोपचार दिवसानिमित्त विविध उपक्रमांतर्गत येथील पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत कार्तिक निसर्गोपचार केंद्रामध्ये निसर्गोपचार व योग कार्यशाळा, तसेच ॲक्युप्रेशर उपचार शिबीर झाले. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन, तसेच नॅशनल इंन्स्टीट्युट ऑफ नॅचरोपॅथी, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोतवाल नगर, लासलगाव रोड, राधिका हाॅटेलजवळ, चांदवड येथे हा उपक्रम झाला.
याप्रसंगी महामंडलेश्वर 1008 श्री स्वामी शिवानंद महाराज, श्रीमती पुष्पावती बाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ. तस्मिना शेख, उपाध्यक्ष रणजित पाटील, सचिव सुनीता पाटील, योगशिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यु. के. अहिरे, कार्तिक निसर्गोपचार केंद्राचे संस्थापक युवराज पर्वत शिंदे, मनोज गावित आदी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार, डॉ. सुशांत पिसे, डॉ. पल्लवी दळवी आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
निसर्गोपचार व योग कार्यशाळा, तसेच ॲक्युप्रेशर उपचार शिबीरात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डाॅ. तस्मिना शेख यांनी नैसर्गिक आहार चिकित्सा या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. योगेश सदगीर यांनी निसर्गोपचार एक समग्र आयुर्विज्ञान याविषयावर माहिती दिली. ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर तज्ज्ञ उदय एकांडे यांनी ॲक्युप्रेशर विषयाची ओळख करून दिली. ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर तज्ज्ञ हेमचंद्र भसे, मिलिंद खरे व निवृत्ती राणे यांनी उपचार केले.
—