नाशिक : प्रतिनिधी
नवरात्रीनिमित्त नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे
अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, यासाठी बालिकाश्रममध्ये भेटवस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या संचालिका सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अकॅडमीच्या मुलींनी यासाठी मदत गोळा केली होती. याप्रसंगी समीर करंदीकर, साक्षी चव्हाण, श्रीया जांबोटकर, दिशा पलाडे, गायत्री पगारे, अवनी नायर आदी उपस्थित होते.
प्रत्येक मुलीला पाय व कानातील आभुषणे, टिकली, कंगवा,आरसा, नेलपेंट, काजळ, लिप बाम, टूथब्रश, पाकीट, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, चिप्स, राजगिरा लाडू पाकीट, बिस्कीट आदी १७ वस्तू देण्यात आल्या. तसेच दसऱ्याच्या दिवशी त्यांना गोडाचे जेवणाच्या व्यवस्थेसाठी अनाथ आश्रमाला देणगी दिली.
तांदूळ, डाळ, तेल, गव्हाचे पीठही देण्यात आले. नृत्यालीतर्फे दरवर्षी नवरात्री पर्वामध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो.
—