नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे निसर्ग विद्यानिकेतन महाविद्यालय व अभिलाषा निसर्गोपचार केंद्रातर्फे गुरूजनांना उपाधी प्रदान व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (दि.1) होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी बारा वाजेदरम्यान गुरूदक्षिणा प्रोजेक्ट, टी. ए. कुलकर्णी हाॅल (तिसरा मजला) येथे हा कार्यक्रम होईल.
अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कंटिन्युईंग एज्युकेशनचे संचालक प्रा. डाॅ. जयदीप निकम असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आयएनओचे कार्यकारी अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज व जान्हवी मशिन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक गोविंद झा उपस्थित असतील. यावेळी प्रा. डाॅ. प्र. द. कुलकर्णी, सुरेश पवार, डाॅ. तस्मिना शेख, अशोक पाटील, यु. के. अहिरे, मोहम्मद सय्यद, एन्नुदीन शेख व साबिक शेख यांना विविध उपाध्यांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
संस्था भविष्यात आणखी विविध अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच इतरही निसर्गोपचार केंद्रे कार्यरत आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे योग व निसर्गोपचार क्षेत्रात प्रबोधन आणि व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत होत आहे.
—