नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह येथील आयटीआयमध्ये ऑगस्ट 2025 च्या नवीन प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
आयटीआयचे गटनिदेशक उमेश पालवे यांनी नवीन प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच निदेशक आनंद जाधव यांनी उपस्थित निदेशक व कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. यावेळी मंचावर आयटीआयचे निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अजय पवार, योगेश गांगोडे, संजय पवार, संदीप काजळे, मधुकर सानप, अमोल नागरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
—