“ईश हमे देते है सब कुछ”
“हम भी तो कुछ देना सीखे”
“ जो कुछ हमे मिला प्रभू से”
“वितरण उसका करना सिखे”
प्रकृतीपासून आपणास सर्व काही मिळालेले आहे. ते आपल्याला पुनश्च प्रकृतीला देणे आवश्यक आहे.
आज आपणास प्रथम मनुष्य बनलं पाहिजे. कारण की, मनुष्ययोनीत ज्ञान, विज्ञान,अध्यात्म आणि बुद्धी ही दिली असूनही त्यास प्रकृती व पुरुष, त्याचप्रमाणे ईश्वराची संपूर्ण माहिती अभ्यासली पाहिजे. मानवात असलेल्या ईश्वर अंशाची अनुभूती त्यानंतरच येणार आहे. ही अनुभूती निसर्गमय योगाच्या माध्यमातून करता येणार आहे.
“ निसर्गमय जीवन म्हणजेच पंचमहाभूतांचे -पंच तत्त्वांचे शरीरांतर्गत समतोल साधून निसर्गाच्या सानिध्यात योग करणे”
प्रत्येक मनुष्य सुखाचा भुकेला आहे.
निसर्गात गेल्यास आपोआप प्रसन्नता येते की नाही?
हा प्रश्न माझा आता तुम्हा सगळ्यांसाठी आहे.
आपले पूर्वज कसे जगले ? आपल्या पूर्वजांच्या काळात अनैसर्गिक आजारांचा विळखा, कोणाला आठवतोय का? आपणास प्रकृती सोबत ताळमेळ ठेवून कसे जगावे? माहिती आहे का? निसर्गाशी कसे जुळवून घ्यायचे? पंचतत्त्वांचा समतोल कसा राखावा?
कारण निसर्गासोबत जर तुम्ही नसाल तर निसर्गाने तुमचे साथ का द्यावी?
माझे ठाम मत आहे, आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यास, आपणास पंचमहाभूतांची पंचतत्व उमगल्यास योग आपोआप होतो.
प्रकृती आपोआप बरी करते
प्रकृती आपणास आपोआप बरी करते. विचार करा, एखाद्या प्रसंगात अडकलात अन् अन्न मिळाले नाही आकाश तत्व म्हणजे उपवास चिकित्सा घडली की नाही? कंदमुळे फळ पाणी मिळाले तर आहार चिकित्सा घडते. आता सांगा आपले पूर्वज सक्षम ताकतवर बलवान मानव नव्हते का? आपले पूर्वज ऋषी-मुनी, सुफी संत हे आपले वैभव – त्यांच्या प्रत्येक शब्दावर, वाक्यांवर, लिखितांवर आपण रिसर्च पीएचडी करत आहोत. त्यांचे मूळ उद्दिष्ट काय होते? आणि आपले उद्दिष्ट काय आहे?
खऱ्या ईश्वर स्थितीची अनुभूती हे उद्दिष्ट
योग म्हणजे केवळ आसन / व्यायाम एवढीच माहिती असणाऱ्यांसाठी सांगते. त्यांना निसर्गमय योगामुळे व्याधीच होत नव्हती. मग खऱ्या ईश्वर स्थितीची अनुभूती हे त्यांचे उद्दिष्ट होते.
आचरणात निसर्गयोग
योग हे कल्पवृक्ष आहे जसे बघणार, तसे बहरणार, तसेच दिसणार. व्याधींसाठी वेगळे, मन:शांतीसाठी, चित्त वृत्तीच्या निरोधासाठी, आत्मशांतीसाठी, ध्यान-धारणा, समाधीसाठी हा योग आहे. अति पुस्तकी ज्ञान घेतलेल्यांपेक्षा खेड्यातील व्यक्ती जो प्राकृतिक योग करतोय, तो ब्रह्मज्ञान आपणास शिकवून जाईल.
अनुभवणे सांगते कारण त्याच्या आचरणात निसर्गयोग आहे. तो सत्य बोलतोय, नियमाचे पालन करतोय आणि त्याच्याकडून ब्रह्मउपदेश आपल्याला ऐकायला जर मिळाले मिळाले तर त्याचे कारण त्याच्यात प्रकृतीचा अतिवशक्तीचा स्त्रोत वाहतोय. त्याचा निसर्गमय योगी झालाय.
आता आपण निसर्गाशी जुळलोय की नाही माहित नाही पण निसर्ग तुमच्याबरोबर जोडला गेला आहे. आपणास आनंद निसर्ग देतो. ही अनुभूती निसर्गमय योगाच्या माध्यमाने करता येते. आपण निसर्ग उपचार आणि योग आचरणात आणाल अशी आशा करते, धन्यवाद.
– डॉ. तस्मिना शेख
(डी.एन.वाय.एस, बी.एन.वाय.एस, M.A इन यौगिक सायन्स)
Specialist – Cupping therapy, Accupuntur, Acupressure)