नाशिकच्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रम उत्साहात

0

नाशिक  : प्रतिनिधी
गंगापूर रोडवरील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) येथे शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) ला राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. मयूर मानकर होते.
आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विविध ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित प्रात्यक्षिके, मॉडेल्स व अभिनव प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्राचार्य नितीन काळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची भूमिका अधोरेखित केली.

गटनिदेशक उमेश पालवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मानकर यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन करत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी विज्ञान दिनाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान, दैनंदिन जीवनातील विज्ञान अशा विविध विषयांवर प्रशिक्षणार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली. तसेच पोस्टर्स स्पर्धेतसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली.
वकृत्व स्पर्धेत आणि पोस्टर्स स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रा. मानकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
गटनदेशक साहेबराव हेंबाडे यांनी आभार मानले. निदेशक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, संदीप काजळे, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, योगेश गांगोडे, अजय पवार, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, राहुल सानप, अमोल नागरे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.