नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित पहिले राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन येथे १० व ११ डिसेंबरमध्ये होणार आहे. संमेलनाच्या तयारीला सुरवात झाली आहे. नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मठ, जनार्दन स्वामीनगर, तपोवन, पंचवटी येथे हे संमेलन होईल. गुरुवर्य मणिभाई देसाई हे नाव व्यासपीठाला देण्यात येणार आहे.
राज्य व स्थानिक नियोजन समिती तयार करण्यात आली आहे. योग शिक्षक संमेलनाची आढावा बैठक नुकतीच झाली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील यांनी विविध समित्यांना मार्गदर्शन केले. प्रसारमाध्यम, भोजन, निवास व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय, सुरक्षा आदी विविध समित्या गठित करण्यात आल्या.

नाशिक हा योगाचा ब्रॅण्ड : योगाचार्य पाटील नाशिक हा योगाचा ब्रॅण्ड होत आहे. त्यादृष्टीने योगशिक्षक संमेलन नाशिकला भरवत आहोत. यासाठी योगाभ्यास करणारे विद्यार्थी व शिक्षक हिरिरीने या आध्यात्मिक उत्सवात सहभागी होत असून, नाशिककरांना योगा उत्सवात सहभागी होण्याची पर्वणी असणार आहे. – योगाचार्य अशोक पाटील, योग संमेलनाध्यक्ष, नाशिक

योग शिक्षकांनी लाभ घ्यावा
नाशिक ही योगाची पुण्यभूमी असून या नगरीत प्रथमच महाराष्ट्र योग शिक्षक संघामार्फत योग शिक्षकांचे राज्यस्तरीय संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व योग शिक्षकांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, तरी याचा जास्तीत जास्त योग शिक्षकांनी लाभ घ्यावा ही विनंती.
– राहुल बी. येवला
उपाध्यक्ष – योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योग शिक्षक संघ व अध्यक्ष – राज्य नियोजन समिती व संमेलन प्रमुख – १ ले योगशिक्षक संमेलन नाशिक (महायोगोत्सव दि. १० व ११ डिसेंबर 2022)
—

सक्रीय सहभाग घ्यावा
नाशिकमधील राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन सर्वार्थाने नाविन्यपूर्ण असेल, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच योगशिक्षकांनी या संमेलनाच्या तयारीत सक्रीय सहभाग घ्यावा. त्यामुळे संघटन कामाचा अनुभव मिळेल.
– डाॅ. तस्मीना शेख
जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष तथा राज्य ग्रामीण प्रकोष्ठ प्रभारी –
महाराष्ट्र योग शिक्षक संघ