नाशिक : प्रतिनिधी
उत्तराखंड येथील टनेल दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणारे कर्नल दीपक पाटील यांचा पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व मविप्रचे माजी संचालक नाना महाले, ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ. तस्मिना शेख, उपाध्यक्ष रणजित पाटील, सचिव सुनिता पाटील, काॅग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी भारत टाकेकर, प्रसिद्ध व्यापारी शंकरराव टाकेकर, इंडियन ऑईलचे डिलर विनोद टाकेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नविन सिडकोतील वाॅर्ड 24 चे नगरसेवक राजेंद्र महाले, डाॅ. पूनम महाले, डाॅ.योगेश महाले, योगशिक्षक संघटनेचे यू. के. अहिरे व अशोक पाटील, सेवानिवृत्त डीवायएसपी विजय सोनवणे, बी. आर. हरणे काॅलेजचे वांगणी (जि. ठाणे) येथील संचालक मंगेश हरणे, किरण हरणे, दीपक महाले, सुरेखा महाले, नरेश म्हस्के, प्रतिभा म्हस्के आदी उपस्थित होते.
कर्नल पाटील हे अभियंत्यांच्या कॉर्प्समधून लष्करी अधिकारी सेवा करत आहेत. त्यांनी देशभरात जवळपास 54 ठिकाणी आणि 18 पोस्टिंगमध्ये विविध ठिकाणी काम केले आहे. आसाम रायफल्स, बॉर्डर रोड, कॉर्प्स मुख्यालय, विभागीय मुख्यालय, एमईएस, राष्ट्रीय महामार्ग, सियाचीन ग्लेशियर्स,अरुणाचल, मणिपूर, जम्मू आणि काश्मिर, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू येथे सेवा दिली आहे. आसाम आणि इतर दुर्गम ठिकाणी बीएस्सी फिजिक्स, बीटेक सिव्हिल इंजिनीअरिंग, टनल इंजिनीअरिंग आणि अनेक मिलिटरी कोर्सेसचा अभ्यास केला आहे. मिलिटरी हिस्ट्री बफ, स्नायपर शूटिंग, गायन, पेंटिंग, क्रॉसिंग कंट्री, रनिंग, रॉक मेचॅन्सचा अभ्यास केला होता. जागतिक भू-राजकारण, रोहतांग, झेड मोर, झोझिला आणि सिल्कियारा या चार बोगद्यांच्या बांधकामातही त्यांचा मोलाचा वाटा होता. तो कोसळल्यावर तेथे बचाव अधिकारी म्हणून काम पाहिले व बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना बाहेर काढले.
—