म्हसरूळला श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

0

म्हसरूळ, (वा.)
येथील गुलमोहरनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश किसनराव पेलमहाले यांच्या `हो आपण हे करू शकतोʼ या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. सोनसाखळी चोरीच्या घटना लक्षात घेता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.


म्हसरूळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक आहेर यांच्या हस्ते व स्वामी समर्थ केंद्राचे व्यवस्थापक, सेवेकरी लोटन महिंद्र, किरण शिरसाठ व इतर स्वामी सेवकांच्या उपस्थितीत या कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वंदना गणेश पेलमहाले यांनी उपस्थित महिला सेवेकरी यांना हळदी- कुंकू लावून मास्क वाटप केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.