अभिनव बालविकास मंदिर शाळेत मराठी राजभाषा गौरवदिन साजरा

0

नाशिक  : प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत मराठा राजभाषा गौरवदिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास सिन्नरचेचे नगराध्यक्ष विठ्ठल वाजे उगले, मविप्र समाज संस्थेचे सिन्नर तालुक्याचे संचालक कृष्णाजी भगत, कसमादे मराठा उत्कर्ष संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण सोनवणे, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याध्यापिका अशा उमाप यांनी प्रास्ताविकात मराठी ही केवळ भाषा नसून आपली संस्कृती आणि ओळख असल्याचे सांगितले. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीवर आधारित वेगवेगळी पारंपारिक नृत्य सादर केली. भगत यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, असे सांगितले. शेवटी मराठी भाषेच्या गौरवासाठी उपस्थितांनी मराठी भाषेतविषयी निष्ठा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष सुमनताई खुळे, इंदुताई कोकाटे, शोभाताई कणसे, ताई गाडे , गोजरे गुरुजी, तसेच मविप्र समाज संस्थेतील माजी मुख्याध्यापक भंडारी, यू.  बी. पवार, मंगला पवार, कोतवाल, तसेच साहेबराव पवार, बी. जी. थोरात, देशमुख, लोंढे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास पालकांनी विशेष गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनवच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पवार यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.