अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

0

नाशिक  : प्रतिनिधी
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मराठी भाषा गौरवदिन उत्साहात साजरा ञाला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देणे, मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, तसेच मराठी साहित्यामधील कुसुमाग्रज यांच्या योगदानाची जाणीव करून देणे हा होता.
भोसला मिलिटरी कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद पवार यांनी “मराठी भाषा, संस्कृती आणि समाज” या विषयावर व्याख्यान दिले. कुमार राजेश्वर याने मराठी साहित्यातील कुसुमाग्रज यांच्या योगदानाविषयी भाषण केले. डाॅ. पवार यांनी, मराठी भाषा जगभर कशी पोहोचली याविषयी माहिती दिली. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी असून बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिचा नववा क्रमांक लागतो, तसेच विविध देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ हा दर्जा कसा मिळाला याविषयीही त्यांनी माहिती दिली. भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी भाषांची देवाणघेवाण आवश्यक असल्यावर त्यांनी विशेष भर दिला.
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या महत्त्वाला समर्पित समूह नृत्य व समूहगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमासाठी अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक कटरिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. स्मिता बोराडे यांनी केले. विद्यार्थी परिषद सदस्य, तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कक्षिक भवर आणि गणेश खर्माटे यांनी सूत्रसंचालन केले. सृष्टी कुटे हिने आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.