नाशिक : प्रतिनिधी
पुस्तक वाचनाने चांगले संस्कार घडतात, असे प्रतिपादन डॉ. गोपाळ गवारी यांनी केले. ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालय (मखमलाबाद) यांच्यावतीने लेखक व वाचक यांच्यामधील संवाद या विषयावर कार्यक्रम झाला. याप्रसंगी डाॅ. गवारी बोलत होते.
नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल व सहकार महर्षी पोपटराव पिंगळे प्रायमरी स्कूल, मखमलाबाद येथे हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, कार्यवाह मुख्याध्यापक शंकर पिंगळे, संचालक माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, संजय फडोळ, संजय गामणे, प्रताप काकड, मुख्याध्यापिका हेमलता ढोली (पिंगळे), मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड उपस्थित होते.
डाॅ. गवारी म्हणाले की, श्यामची आई हे पुस्तक म्हणजे संस्काराचा एक अमूल्य ठेवा होय. बालवयात आई, वडिल व शिक्षकांचे संस्कार आयुष्यभर टिकतात.
संजय फडोळ यांनी, वाचनालयाच्या उपक्रमाची माहिती देऊन वाचनालयाचे बाल सभासद व्हावे, असे आवाहन केले. कार्यवाह शंकर पिंगळे यांनी टीव्ही, मोबाईलपासून दूर होऊन पुस्तकांशी मैत्री करावी, असे सांगितले. ग्रंथपाल ग्रंथमित्र राजेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी संवाद साधला. आराध्या तिडके हिने सावित्रीबाई फुले यांच्याविषयावर एकांकिका सादर केली. रामदास पिंगळे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षिका वंदना पाटील, अर्चना साबळे, सुप्रिया जाधव, बाळासाहेब भोई, दशरथ मानकर उपस्थित होते. संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वंदना पाटील यांनी आभार मानले.
—