लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीमच्यावतीने आदिवासी भागात शंभर साड्यांचे वाटप

0

नाशिक : प्रतिनिधी
पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भुवन या गावी  नाशिक लायन्स क्लब सुप्रीमच्यावतीने १०० महिलांना मोफत साड्या व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास लायन्सचे अध्यक्ष एन. एस. पाटील, संस्थापक अध्यक्ष जे. पी. जाधव, माजी अध्यक्ष धात्रक, सेक्रेटरी कारभारी धात्रक, दिलीपसिंग पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश भामरे, संचालक हिरामण सोनवणे, किरण सोनवणे उपस्थित होते.
जे. पी. जाधव यांनी सांगितले की लायन्स सुप्रीमच्यावतीने आदिवासी भागात गेल्या पाच वर्षापासून नियमित आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू शिबिरे, तसेच दीपावली फराळ, साड्या, ब्लॅंकेट वाटप, भजनी मंडळींसाठी टाळ मृदुंग, शाळेस साऊंड सिस्टिम असे अनेक प्रकारचे वाटप करत आहोत. लायन्स सुप्रीम ही सामाजिक कामात कायम अग्रेसर असते.
अध्यक्ष निवृत्ती पाटील म्हणाले जेथे गरज तिथे लायन्स आहे. तसेच तुमच्या मुलांना खूप शिकवा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याप्रसंगी कारभारी धात्रक, सुरेश भामरे, दिलीपसिंग पाटील यांचीही भाषणे झाली. तसेच पुढील वर्षी १०० आंबेरोपांचे वाटप करण्याचे ठरले. कार्यक्रमास भुवन गावचे सरपंच विलास दरोड, कुंभाळे गावचे सरपंच मोहन तांबडी, नामदेव भालेराव व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हिरामण सोनवणे यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.